Wed. Jul 28th, 2021

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरूणीवर जीवघेणा हल्ला

पुण्यातील डांगेचौकात आज ( ता. २६ ) एका तरूणीवर जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आला.  त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम संबंधातून ही घटना घडली आहे.

पुण्यातील डांगेचौकात आज ( ता. २६ ) एका तरूणीवर जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आला.  त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम संबंधातून ही घटना घडली आहे. या हल्यात पीडीत तरूणी गंभीर जखमी असून हल्लेखोराला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील डांगे चौकात एका तरूणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यामुळे परीसर हादरून गेले आहे. गौरी विठ्ठल माळी असे पिडीतेचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकरणी विकास शांताराम मेठे याला पोलिसांनी अटक केली आहे. डांगे चौकातील स्पंदन हॅास्पिटल मध्ये गौरी रिसेप्शनिस्ट होती.

ती 10 वाजण्याच्या सुमारास घरून हॅास्पिटलकडे यायला निघाली होती. डांगेचौकात येताच विकासने पाठीमागून येत तिच्या पाठीवर चाकूने सपासप वार केले.

गौरी वर वार करणाऱ्या तरूणाचे गौरीवर प्रेम होते. अशी माहिती मिळाली आहे. विकासला गौरीशी लग्न करायचे होते आणि यासाठी त्याने गौरीकडे तगादा लावला होता.

परंतु, गौरीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरले होते. या कारणामुळे गौरी आणि विकास यांच्यात खटके उडत होते.वैतागलेल्या गौरीने विकासचा फोन नंबर ब्लॅाक करून ती त्याला टाळत होती.

त्यामुळे चिडलेल्या विकासने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेसंबंधी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *