Sun. Sep 19th, 2021

जावयाचा लोखंडी रॉडने वार, सासू जागीच ठार!

सासुबाबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने खून केला असल्याची घटना पुण्यात घडली आहे. औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात ही घटना घडली आहे. सुदामती देवराम गायकवाड वय 60 असे या मृत महिलेचे नाव आहे. जावयाने सासूवर लोखंडी रॉडने वार केल्याने तिची जागीच मृत्यू झाला आहे. दिगंबर ओव्हाळ वय 45 याला चतुंश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे.

खूनाचं नेमकं कारण काय?

पुण्यात लोखंडी रॉडने वार करून सासूचा खून केल्याची घटना औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात घडली आहे.

सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने हा खून केल्याचे यामध्ये समजले आहे.

सुदामती देवराम गायकवाड (६०, रा. संजय गांधी वसाहत) असे मृत महिलेचे नाव आहे.

तर दिगंबर ओव्हाळ (वय ४५ ) याला चतुंश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय.दिगंबर ओव्हाळ हा मजूरीचे काम करतो. त्याचे यापुर्वी एक लग्न झालेले आहे.

तर सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याने दुसरे लग्न केलेले आहे.

सासू – जावायामध्ये वारंवार खटके

सुदामतीच्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर ते औंध येथील संजय गांधी वसाहतीतील राहत होते.

सासू सुदामती आणि दिगंबर आणि त्याची पत्नी जवळच राहण्यास होते.

सुदामती गायकवाड या वारकरी होत्या.त्यामुळे त्यांना दारू मांस खाल्लेलं आवडत नव्हते.

परंतु दिगंबरला दारूचे व्यसन असल्याने त्याला सुदामती गायकवाड दारू पिऊन आल्यावर घरात येऊ देत नव्हत्या.

या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते.

दरम्यान आज दुपारी तो घरी असताना त्याचे सासूशी काही किरकोळ कारणावरून वाद झाले.

त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने सासू सुदामती गायकवाड यांना बेदम मारहाण केली.त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *