सासू-सुनेचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

He was found at the crime scene

वृत्तसंस्था, मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक ह्रद्यद्रावक घटना घडली आहे. सासू-सुनेचा वाद विकोपास जाऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जबलपुरातील नुनसरमधील जरोंद गावात ही घटना घडली.


सासू-सुनेने एकमेकांच्या गळ्यावर सुरा चालवला. या घटनेत सासूचा मृत्यू झाला. तसेच मुलगा आणि सूनही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


75 वर्षीय सासू त्यांचा मुलगा आणि सूने सोबत राहत होत्या. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मिनिटांनी घरातील सून आरडा-ओरडा करीत बाहेर आली. तिचा गळा कापला होता आणि रक्त वाहत होतं. त्यावेळी हा प्रकार समोर आला. तिघांना तातडीने पाटन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सासूला मृत घोषित केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version