Jaimaharashtra news

दुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं

देशात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातून हत्याकांडाच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतचं वर्धा दुहेरी हत्याकांडांने हादरलं आहे.

वर्ध्यातील निमगव्हाण येथे आई आणि मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जनाबाई निळकंठ राऊत असं आईचे नाव असून सुरेंद्र निळकंठ राऊत असं मुलाचे नाव आहे. अज्ञातांनी डोक्यावर वार वरून दोघांची हत्या केली आहे. यामुळे मृतकांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा दिसून आल्या आहेत.

ही घटना गुरूवारी रात्री घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा शेतातून दुचाकीवर जात असताना अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शवला आहे.

याप्रकरणी पुलंगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक कसून पुढील तपास करत आहेत.  

Exit mobile version