पत्रकार हत्याप्रकरणी राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला पत्रकाराच्या रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच 50 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आलाय. सीबीआयने राम रहीमला फाशीची शिक्षा देण्याची याचिका केली होती. मात्र त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

16 वर्ष जुन्या प्रकरणातील राम रहीम सोबतच्या निर्मल सिंह, कृष्ण लाल, जगदीप सिंह यांना पण शिक्षा देण्यात आली आहे. 51 वर्षीय राम रहीम त्याच्या 2 महिला साध्वी  बलात्कार प्रकरणात सुनारिया जेलमध्ये आधीच 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. रामचंद्र छत्रपती यांनी आपल्या ‘पूरा सच’ या वर्तमानपत्रात राम रहिमचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे 2002 साली रामचंद्र यांची गोळ्या घालून हत्या केली.

कोर्टाने या प्रकरणी रामरहिमला 11 जानेवारी रोजीच सुनावणीदरम्यान दोषी ठरवलं होतं. मात्र, आज शिक्षा सुनावली. या पार्श्वभूमीवर पंचकुला, सिरसा आणि हरियाणाच्या इतर भागात कायदा व्यवस्था राहण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. तसंच पंचकूला न्यायालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version