Tue. Oct 19th, 2021

ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ७९ व्या वर्षी त्यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी पहाटे त्यांचं निधन झालं. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण हे मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते. राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील असून आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला.

राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. त्यांनी मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *