Fri. Sep 30th, 2022

‘मन फकीरा’चं म्युझिक लॉन्च दिमाखात संपन्न

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या रोमँटिक ड्रामाची कथाही तिनेच लिहिली आहे. सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. या सिनेमाचं म्य़ुझिक लॉन्च मुंबईमध्ये नुकतंच झालं.

या Music Launch सोहळ्यासाठी दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार उपस्थित होते.

त्याशिवाय, संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि यशिता शर्मा हेदेखील उपस्थित होते.

या संगीत सोहळ्याचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी यांनीच सूत्रसंचालन केलं.

यावेळी सुव्रत जोशीने Honeymoon च्या पहिल्या रात्री जोडप्यांमध्ये होणाऱ्या गंमती–जमतींवर स्टॅण्ड-अप कॉमेडी स्किट सादर केलं.

कवी-गीतकार वैभव जोशी यांच्या प्रेमावरील काही कविता Audio-Visual माध्यमातून दाखवल्या गेल्या.

सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आणि गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे, यशिता शर्मा, गौतमी देशपांडे, निकिता गांधी या सर्व गायकांनी वाद्यवृंदाच्या साथीने ‘मन फकीरा’ सिनेमातील गाण्यांचं एक मस्त Jamming session केलं.

यात ‘मन फकीरा’, ‘घरी गोंधळ’, ‘सांग ना’, ‘समथिंग इज राईट’ यांसारख्या गाण्यांनी मैफिल रंगवली.

“या सिनेमाची गाणी खूप वेगळ्या धाटणीची आहेत. सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल यांनी अशाच पद्धतीची खूप उत्तम दर्जाची गाणी ‘मन फकीरा’साठी रचली आहेत. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. या सिनेमाचं नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या गाण्यांनादेखील तसाच प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे,” मृण्मयी देशपांडेने म्हटले.

‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे. हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.