‘त्या’ ‘नरेंद्र मोदी’चं नाव आता ‘मोहम्मद अल्ताफ आलम मोदी’!

मतमोजणीच्या दिवशी निर्माण झालेली ‘मोदीलाट’ इतकी तीव्र होती की उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाने 23 मे रोजी जन्मलेल्या बाळाचं नाव ‘नरेंद्र मोदी’ असं ठेवलं. मात्र आता त्याचं नाव बदलून ‘मोहम्मद अल्ताफ आलम मोदी’ असं ठेवण्यात आलंय. समाजाने बहिष्कार टाकण्याची भीती दाखवल्यामुळे नाईलाजाने मुलाचं नाव बदलावं लागल्याचं आईचं म्हणणं आहे.
का बदललं नाव?
23 मे 2019 रोजी जन्माला आलेल्या आपल्या मुलाचं नाव मुस्लिम कुटुंबाने नरेंद्र मोदी असं ठेवलं होतं.
मात्र आता त्याच्या जन्मतारखेबद्दलही वाद सुरू झाला आहे.
तसंच गैरमुस्लिम नाव ठेवल्याबद्दल समाजाकडून बहिष्कार टाकण्याचीही धमकी नवजात अर्भकाच्या आई वडिलांना मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
मुलाचं नाव जर ‘नरेंद्र मोदी’ असल्यास त्याचे हकीका आणि खतना केला जाणार नाही, अशी भीती बालकाच्या आई-वडिलांना घालण्यात आली आहे.
अखेर बहिष्कृत होण्याच्या भीतीने मुलाचं नाव आता ‘नरेंद्र मोदी’ऐवजी ‘मोहम्मद अल्ताफ आलम मोदी’ असं ठेवण्यात आलंय.
नरेंद्र मोदींच्या विजयानंतर मुस्लिम कुटुंबाने केली ‘ही’ विलक्षण गोष्ट!
का ठेवलं होतं ‘नरेंद्र मोदी’ हे नाव?
गोंडा जिल्ह्यातील महरौर गावच्या मेनाज यांनी 23 मे रोजी मुलाला जन्म दिला.
त्यावेळी या मुलाचे वडील मुश्ताक अहमद दुबई येथे होते.
मतमोजणीचा दिवस असल्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी फोनवरून विचारलं, “नरेंद्र मोदी आले का?”
मेनाजने या प्रश्नाला “हो” असं उत्तर देत आपल्या मुलाचं नावही नरेंद्र मोदी ठेवलं.
कुटुंबियांनीही हे नाव स्वीकारलं होतं. एका मुस्लिम कुटुंबातील मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवल्याने हे कुटुंब चांगलंच चर्चेत आलं.
मात्र काहीजणांच्या म्हणण्यानुसार बाळाचा जन्म 23 मे रोजी झाला नसून 12 मे रोजीच झाला होता.
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अर्भकाची जन्मतारीख 23 मे सांगून मुलाचं नाव ‘नरेंद्र मोदी’ ठेवण्यात आलं.
मात्र समाजाने बहिष्कृत करण्याची धमकी दिल्यामुळे आता आपल्याला मुलाचं नाव ‘नरेंद्र मोदी’ऐवजी ‘मोहम्मद अल्ताफ आलम मोदी’ ठेवावं लागलं असल्याचं मेनाजने म्हटलं आहे.