Tue. Sep 17th, 2019

नरेंद्र मोदींच्या विजयानंतर मुस्लिम कुटुंबाने केली ‘ही’ विलक्षण गोष्ट!

0Shares

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जल्लोष होत होता. 300हून अधिक जागा आपल्या करिष्म्याने जिंकून आणत नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडवला. या ऐतिहासिक दिवसाची आठवण गोंडा येथील मुस्लिम कुटुंबाने अनोख्या पद्धतीने स्मरणात ठेवली आहे.

मुस्लिम मुलाचं नाव नरेंद्र मोदी!

नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विरोधकांकडून कायमच मुस्लिम विरोधी नेता अशी निर्माण केली जात होती.

मुस्लिम समाज नरेंद्र मोदी प्रणिती NDA ला मतदान कधीच करणार नाही, अशी अनेकांची खात्रीच होती.

मात्र मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपने घवघवीत यश प्राप्त केलं.

यातून मुस्लिम समाजाचा भाजप आणि नरेंद्र मोदी यांना असणारा पाठिंबा दिसून आला.

मतमोजणीच्या दिवशी जेव्हा नव्याने इतिहास घडत होता, त्याचवेळी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक मुस्लिम बालकाचा जन्म झाला.

अशावेळी या उत्सवी दिवसाची आठवण कायमस्वरूपी जपली जावी यासाठी, या मुस्लिम कुटुंबाने आपल्या बालकाचं नाव चक्क ‘नरेंद्र मोदी’ असं ठेवलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रति असणारं प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श हे या मुस्लिम मुलाच्या ‘नरेंद्र मोदी’ या नामकरणाचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *