Tue. Jul 27th, 2021

औरंगाबादेत मुसलमान टोळक्याची पोलिसांना शिवीगाळ

औरंगाबाद: औरंगाबादमधील चेलीपुरा भागात मास्क न घालणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असताना काही मुसलमान तरुणांनी त्या कारवाईला विरोध केला आहे. यावेळी झालेल्या वादामध्ये या मुसलमान टोळक्याकडून पोलिसांना शिवीगाळसुद्धा करण्यात झाले.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार रोखला जावा, याकरिता विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. मात्र मास्क घातला नाही म्हणून कारवाई करणाऱ्या पोलिसांना काही मुसलमान तरुणांनी हटकले आणि नंतर त्या टोळक्याच्या समर्थनार्थ जमाव जमला. त्यात काही महिलासुद्धा सहभागी झाल्या. यामुळे पोलिसांची कारवाई करताना अधिकच कोंडी झाली.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, अशा परिस्थितीतूनही यशस्वीपणे मार्ग काढत पोलिसांनी सिटीचौक पोलीस स्थानकात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना काही नागरिक सहकार्य करत नसल्याचे यामुळे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *