Mon. Jan 24th, 2022

‘अमरावतीमध्ये हिंसाचार नव्हे तर मुस्लिम दहशतवाद’ – किरीट सोमय्या

अमरावतीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान किरीट सोमय्या यांनी अमरावती हिंसाचारावर विधान केले आहे. अमरावती शहरातील हा हिंसाचार नसून मुस्लिमांचा दहशतवाद असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. तसेच हिंदूंना घाबरवून लक्ष्य केले जात असल्याचेही ते म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, १९९२ साली शरद पवारांनी हिंदूंना घाबरवण्यासाठी जो मुस्लिम दहशतवाद निर्माण केला होता त्याचा पुनर्जन्म होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यात तीन मोठे मोर्चे निघतात तरी सरकार गप्प का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदीदेखील लागू करण्यात आली. अमरावतीमध्ये घडलेल्या या हिंसाचारानंतर भाजप नेते किरीट सोमय्या अमरावतीच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यावेळी पोलीस प्रशासनांनी त्यांना अमरावती येण्यास मनाई केली होती. आणि आज अखेर किरीट सोमय्या अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *