Jaimaharashtra news

मुजफ्फरपूर लैंगिक शोषण प्रकरण : स्मशानात सापडली हाडं!

बिहारच्या मुजफ्फरपुरमधल्या महिला वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य अरोपी ब्रजेश ठाकूर आणि साथीदारांनी चक्क 11 मुलींचा खून केला आहे. CBIने कोर्टात याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हटलंय CBI ने?

CBI ने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

मुजफ्फरपूर येथील महिला वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणातील तपासादरम्यान 11 मुलींची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मशान परिसरात खोदकाम करण्यात आलं.

त्यावेळी एक गोणी सापडली.

या गोणीत त्या 11 मुलींची हाडे आढळून आली.

 

लौंगिक शोषण झालेल्या मुलींकडूनच या 11 मुलींची नावं समजली आहेत. गुड्डू पटेल या आरोपीची चौकशी केल्यावर CBI ला ही धक्कादायक माहिती मिळाली.

Exit mobile version