Jaimaharashtra news

दक्षिण आशियातील लाओस देशातील ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित

पृथ्वीवर अनेक अशा गोष्टी आहे ज्या रहस्यमय आहे. ज्याचे गुपित कधीच समोर आलं नाही. अशाच काही गोष्टीचे रहस्य शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी फार प्रयत्न केला मात्र त्यांना यात यश आले नाही. या निसर्गात अशा काही गोष्टी आपल्या दिसतात ज्यामुळे आपण चकीत होऊन जातो. आजही बर्मुडा ट्रान्गल विषयी अनेक गोष्टी आपल्या ऐकायला मिळतात. अनेकवेळा याविषयी चर्चा होतांना बघायला मिळते. मात्र आजही ही जागा रहस्यमय आहे. तसेच आज आपण जाणून घेणार आहोत एका रहस्यमय जागेविषयी आशियाई देश लाओस एक अशी जागा आहे, ज्याला ‘प्लेन ऑफ जार’ म्हणजेच ‘जारचे मैदान’ म्हणतात. येथे मोठ्या दगडांनी बनविलेली हजारो रहस्यमय भांडी आहेत, जी संपूर्ण जगाला चकित करतात. तसेच लाओसच्या झियांगखुआंग प्रांतात अशा प्रकारच्या 90 पेक्षा जास्त जागा आहेत जिथे 400 पेक्षा जास्त दगडी पाट्या आहेत. बर्याच भांड्यांच्या वरच्या बाजूला दगडाचे झाकणही आहे. असे म्हणतात. की या मॅटची उंची एक ते तीन मीटर पर्यंत आहे. तसेच 1964 ते 1973 अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकन हवाई दलाने झियांगखुआंग प्रांतात 260 दशलक्षाहून अधिक क्लस्टर बॉम्ब सोडले होते. यातील बरेच बॉम्ब असे होते की त्यांचा स्फोट अजूनही झाला नाही, बॉम्ब अजूनही जिवंत अवस्थेत आहेत. तसेच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही भांडी हजारो वर्षापुर्वीची असून लोह युगातील आहेत. तथापि त्या काळी हे का बनवले गेले असावी याचे रहस्य आजही स्पष्ट झालेले नाही. मात्र काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही भांडी अंत्यसंस्काराच्या वेळी ते अस्थि कलश म्हणून वापरले गेले असावी. या रहस्यमय आणि अनोख्या जागेला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून लाओस सरकारने यासाठी खूप आधी अर्ज केला होता, त्यानंतर 6 जुलै 2019 रोजी वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. हे स्थान युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात अनन्य आणि रहस्यमय असल्याचे समजले गेले आहे.

Exit mobile version