Sun. May 16th, 2021

‘हे’ आहे साक्षात हनुमानाच्या पुत्राचं रहस्यमय मंदिर!

रामायणात आपल्या रामभक्तीमुळे देवत्व प्राप्त झालेल्या हनुमानाच्या अनेक कथा आहेत. पवनपुत्र हनुमान ब्रह्मचारी होता. बलोपासक असणाऱ्या हनुमानाच्या ब्रह्मचर्य व्रताने प्रेरणा घेऊन आजही कित्येक पैलवान स्त्रियांपासून दूर राहतात. मात्र ब्रह्मचारी असूनही हनुमंताला पुत्र असल्याचा दाखला रामायणात आहे. याच मारुतीपुत्राच मंदिरही आपल्या देशात आहे. हे कसं काय शक्य आहे, ते जाणून घेऊया…

ब्रह्मचारी मारुतीरायाचा पुत्र मकरध्वज’!

ज्यावेळी सीतामाईच्या शोधार्थ बजरंगबली समुद्र लांघून लंकेत गेले, त्यावेळी त्याला राक्षसांनी बंदी बनवलं.

रावणासमोर दाखल झाल्यावर मारुतीरायाच्या शेपटीला आग लावण्यात आली.

मात्र हनुमंताने पेटलेल्या शेपटीने लंकेलाच आग लावली.

लंकादहन केल्यानंतर हनुमानाने आपली शेपटीची आग समुद्राच्या पाण्यात विझवली.

यावेळी घामाघूम झालेल्या मारुतीच्या घामाचा थेंब समुद्रातील मगरीच्या पोटात गेला.

यापासूनच जन्म झाला हनुमानपुत्र ‘मकरध्वज’ याचा.

मात्र या पुत्रासंदर्भात स्वतः हनुमानही अनभिज्ञ होता.

जेव्हा रामरावण युद्धादरम्यान अहि-महि रावणांनी राम, लक्ष्मण यांना मुर्च्छित करून पातालात नेलं, तेव्हा हनुमान त्यांना सोडवण्यासाठी पाताळात शिरला.

मात्र त्यावेळी पाताळाचा पहारेकरी असणाऱ्या मकरध्वजाने त्याला रोखलं.

हनुमान आणि मकरध्वज यांच्यात युद्ध सुरू झालं.

मकरध्वजाने या युद्धात अद्भूत पराक्रम गाजवला.

अर्थातच युद्धामध्ये हनुमंताचा विजय झाला.

हनुमंताने मकरध्वजाला साखळदंडाने बांधून ठेवलं.

मात्र मकरध्वजासारखा पराक्रमी योद्धा नेमका कुणाचा पुत्र आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी हनुमाने मकरध्वजाची चौकशी केली.

तेव्हा मकरध्वज हा आपलाच पुत्र असल्याचं मारुतीरायाच्या लक्षात आलं.

मकरध्वजालाही या गोष्टीचं ज्ञान झाल्यावर त्याने वडिलांना मदत करून पातालाचा दरवाजा खुला केला.

अशा पराक्रमी मकरध्वजाचं मंदिर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरनजीकच्या करहिया भागातील जंगलात मंदिर आहे.

कसं आहे हे मंदिर?

हे प्राचीन मंदिर आहे.

या मंदिराच्या आसपास घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक आयुर्वेदिक वनौषधी आहेत.

या जंगलात अनेक गुंफा आणि पाण्याचे झरे आहेत.

या झऱ्यांचं पाणी एका कुंडात साठतं.

कुंडातलं पाणी मकरध्वजाचं तीर्थ मानून भाविक ते भक्तीभावाने पितात.

हे पाणी प्यायल्याने अनेक रोग दूर होत असल्याची धारणा आहे.

विशेष म्हणजे येथे सात मजली इमारत आहे. या इमारतीची रचना अचंबित करणारी आहे.

या इमारतीचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.

ही इमारत पिशाच्चांनी बांधल्याचं सांगितलं जातं.

या इमारतीला ‘सतखंड’ म्हटलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *