सचिन वाझे सोबतच्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडणार

अंबानी स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्यासोबत दिसलेल्या मिस्ट्री वूमनचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे पथक गुरुवारी रात्रीपासून तपास करत होते.
सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील ४०१ क्रमांकाची खोली मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने भाड्यावर घेतली आहे. तपासानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १६ फेब्रुवारीला सचिन वाझेसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेली महिला हीच असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.