Mon. Aug 19th, 2019

#MaharashtraFlood: ‘नाम फाउंडेशन’तर्फे 500 घरं बांधून दिली जातील- नाना पाटेकर

0Shares

नाम फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पूरग्रस्तांना भेट दिली. त्यांनी शिरोळ भागातील पूरबाधित भागाची पाहणी केली. 100% जमीनदोस्त झालेली घरं आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. यामध्ये नाम फाउंडेशनकडून शिरोळ तालुक्यात 500 घरे बांधून दिली जाणार आहेत, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. यावेळी नाना पाटेकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार गजानन गुरव, जि. प. चे माजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, डीवायएसपी किशोर काळे यांची उपस्थिती होती.

नाना म्हणाले, सरकारला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नियम शिथिल करणं गरजेचं आहे.

यामध्ये सरकारची रमाई योजना असेल, इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना असेल, याच्या अटी शिथील करून द्याव्यात.

तसंच या योजनेद्वारे घरकूलसाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावा.

उरलेले पैसे ‘नाम’ घालेल आणि त्या कुटुंबांना पक्की घर उभी करून दिली जातील.

यासंदर्भात, आज रात्री किंवा उद्या आपण स्वतः ‘नाम फाउंडेशन’च्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सर्व विषय मार्गी लावणार आहे.

सर्वांनी शक्य होईल तेवढी मदत करावी. निसर्गापुढे कोणाचे काय चालत नाही. मात्र पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं.

पहिल्यांदा आपण माणसांबद्दल विचार करु. पुरामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती हळूहळू सुधारेल

शासन एका जनावारामागे 30 हजार देण्यात तयार आहे. शासनाने जनावरांसाठी केलेली मदत पुरणारी नाही. प्रत्येक मृत जनावरासंदर्भातील मदत वाढवण्यासाठी आपण सरकारला विनंती करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

पूरग्रस्तांच्या कामाचं श्रेय कोणी घेण्याची गरज नाही

मला माझ्या मर्यादा आहेत, मी सरकार नाहीय

बॉलिवूड कलाकार का मदत करत नाहीत, या प्रश्नावर उत्तर देणं नाना पाटेकर यांनी टाळलं आपण नकारात्मक विचार का करावा, असं त्यांनी म्हटलं. आयुष्यात जेवढं कमावलंय, ते दुसऱ्याला दिले पाहिजे, असाही विचार त्यांनी मांडला. राज्यातील डा‌क्टरांनी सांगली कोल्हापुर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या सेवेसाठी पुढं येणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. हेच माझे पुण्य आहे, असेही नाना पाटेकर म्हणाले.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *