Thu. Oct 21st, 2021

नाही तर तुम्हीही नागमणी मिळवण्याच्या अमिषाला बळी पडाल

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

तुमचे दु:ख दूर होईल, तुमच्या प्रेमातील अडथळे दूर होतील, गरिबी दूर होईल असं आमिष दाखवून गोरगरीब जनतेला टोप्या घालणाऱ्या माणसांची समाजात कमतरता

नाही.

 

अशीच एक घटना बुलडाण्यातल्या नांदुरामध्ये घडली. नागमणी विकत घेतल्यानं तुमची गरिबी दूर होईल असं आमिष दाखवून अजमद शेख इस्माईलला गंडा घालण्याचा

प्रयत्न विलास काळे आणि त्याच्या टोळीचा होता.

 

3 लाखांना नागमणीचा सौदा ठरला. मात्र, इस्माईलला ह्या लोकांचा संशय आल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि नकली नागमणीचा गोरख धंदा

करणाऱ्या 4 ठगांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *