मुंबईत तब्बल 21 कोटीचे 7 किलो युरेनियम जप्त; एटीएसकडून दोघांना अटक

मुंबई : अवैध रित्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना नागपाडा एटीएसने अटक केलं आहे. जीगर पंड्या आणि अबुल ताहिर फजल हुसेन, असं या दोघांचं नाव असून या आरोपींकडून तब्बल 21 करोड 30 लाख रुपये किंमतीचा 7 किलो 100 ग्राम इतका युरेनियमचा साठा जप्त केला आहे. एक व्यक्ती अवैधरित्या युरेनियमची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती नागपाडा एटीएसला मिळाली होती.

त्यानंतर या माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचला आणि जीगर पंड्या याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता युरेनियमचे तुकडे अबू ताहिर व अफजल चौधरी याने जीगरला विक्रीला दिले असल्याचे सांगितले. जीगर आणि अबू हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यानंतर एटीएसने अबु ताहिर यांच्या लोहार गल्लीमधील गाळ्यात छापा टाकला. यावेळी 7 किलो 100 ग्राम युरेनियम जप्त करण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 मे पर्यंतची एटीएस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version