ऑक्सिजन तुटवड्याबाबत नागपूर खंडपीठाचे प्रशासनाला आदेश

नागपूर: राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेसचादेखील वापर केला जात आहे.
मात्र नागपुरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढला असून ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी रिकाम्या सिलेंडरचाच तुटवडा असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे ऑक्सिजन भरण्यासाठी उद्योगातील सिलेंडर ताब्यात घ्या, असे आदेश नागपूर खंडपिठाने प्रशासनाला दिले आहेत. त्याच प्रमाणे आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदत घ्या असंदेखील खंडपीठानं प्रशासनाला सांगितलं आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Exit mobile version