नागपूरच्या भाजप नगरसेवकावर जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपूरचे भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंशी विरोधात भूखंड हडपणे, जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक जगदीश ग्वालबंशी हे भूमाफिया दिलीप ग्वालबंशीचे नातेवाईक असून, भूखंड पाहण्यास गेलेल्या एका जमीन मालकाचा भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंशीने त्याच्या
साथीदारांसह रस्ता अडवून, खंडणी मागितल्याची तक्रार गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
याआधीही भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंशीविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.