Tue. Oct 26th, 2021

देवेंद्र फडणवीस यांचा मविआवर हल्लाबोल

नागपूर: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नागपुरमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असं फडणवीस म्हणाले. तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. असा देखील त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्यासाठी सांगितलं आहे. या सरकारचं एक मस्त आहे, यांचं एकमेकांशी पटत नाही. पण एका गोष्टीवर यांचा एक सूर आहे, बाकी एकमेकांचे लचके तोडायला ते तयार आहेत, पण सत्तेचे लचके तोडतांना एक आहे. आणि जिथे हे पडले धडपडले, जिथे अपयशी ठरले, नापास झाले तिथे एका सूरात बोलतात मोदींनी केलं पाहिजे, मोदींनी केलं पाहिजे’, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘स्वतः काही करायचं नाही. आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदींमुळे झालं, मोदींनी केलं असं सांगायचं . पण ये पब्लिक है, ये सब जानती है!’, असं फडणवीस म्हणाले. ‘या देशात ७० वर्षानंतर नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, त्या दिवशी ओबीसींना पहिल्यांदा संविधानात जागा मिळाली’, असंदेखील फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *