नागपूरात अल्पवयीन मुलीवर अ’त्याचार; दोन आरोपींना अटक

राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत असून नागपूर जिल्ह्यातील धामनालिंगा गावात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या पीडिताला रस्त्यात अडवून अपहरण केले. पीडिताला स्मशानभूमीत घेऊन सामूहिक अत्याचार केल्याचे पीडिताने सांगितले.
नेमकं काय घडलं ?
नागपूरच्या धामनालिंगा गावात 13 वर्षीय मुलीवर चार जणांनी मिळून अत्याचार केल्याची घटना घडली.
रविवारी दुपारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या पीडिताला चार जणांनी भररस्त्यात मोटारसायकलवर बसवून स्मशानभूमीत घेऊन गेले.
त्यानंतर तिथे चार जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
हा प्रकार पीडिताने आपल्या पालकांना सांगितला.
पीडिताने आरोपींविरोधात सामूहिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे.