Mon. Sep 27th, 2021

नागपुरात 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित तर 79 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 29 हजार 53 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शहरात 4 हजार 503 बाधित मिळून आले आहेत. नागपूर -कोरोनामुळे संपुर्ण देशात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागपूरची परिस्थिती देखील चिंताजनक आहे. शिवाय शनिवारी आलेल्या अहवालात 79 जण दगावले आहेत. तर 6 हजार 959 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मृतांची संख्या 135 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये यवतमाळ , अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातील परिस्थिती देखील गंभीर दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात 29 हजार 53 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शिवाय शहरात 4 हजार 503 बाधित मिळून आले आहेत. 2 हजार 447 कोरोनाबाधित मिळून आले आहेत. यात शहरात 40, ग्रामीण 33, आणि बाहेर जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यूने पुन्हा भर पडली आहे. आजपर्यंत 6,188 बधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 5 हजार 4 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. तर आजपर्यंत 3 लाख 15 हजार 999 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

नागपूर जिल्हा 17 एप्रिलच्या आकडेवारी

नव्याने कोरोना बाधित 6 हजार 959

कोरोना मुक्त झालेले 5004

आज कोरोनामुळे झालेले मृत्यू 79( शहरात 40, ग्रामीण 33, जिल्ह्याबाहेर 6)

कोरोना चाचण्या -29 हजार 53

एक्टिव्ह कोरोना रुग्ण- 66 हजार 208

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *