Tue. Dec 7th, 2021

एमबीबीएस डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

नागपूर: नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि मेयो रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ते रुजू होणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. गेल्या एक वर्षापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. पण सरकार मात्र अजून कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांना लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ते रुजू होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. नागपूरमधील ३५० इंटर्न डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहेत.

काय आहेत डॉक्टर्सच्या मागण्या?

१. मुंबई आणि पुण्याच्या इंटर्न डॉक्टरांना मागील वर्षीप्रमाणे ५०,००० रूपये मानधन मंजूर करावे.

२. त्यांना दिल्याप्रमाणे ३०० रूपये प्रति दिवस जेवण, प्रवास भत्ता सर्वांना मंजूर करावा.

३. कोव्हिड ड्युटीनंतर विलगीकरणाची व्यवस्था करावी. त्याकाळात आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी.

४ .शासनाने सर्व इंटर्न डॉक्टरांना विमा कवच प्रदान करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *