Tue. Oct 26th, 2021

धक्कादायक! बापानेच केली चिमुकल्याची हत्या

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून सत्यम केवळ एक वर्षांचा होता. तर भजन कौरती असे आरोपीचे नाव असून खापरखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी भजन कौरती हा दारूच्या नशेत घरी आला. तेव्हा त्याने पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले तेव्हा त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्या पती पत्नीच्या वाद झाला. ‘मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिलास’, असं म्हणत भजन याने त्याचा एक वर्षीय चिमुकला सत्यम याला अंगणातील दगडावर फेकले,ज्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली आणि सत्यमचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपी भजन याची पत्नी मथुरा हिच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *