Sat. Apr 20th, 2019

#IndiaElections2019 नितीन गडकरी आणि नाना पटोले यांनी बजावला मतदानाचा हक्क

49Shares

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असून महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान होत आहे. नागपूरमध्ये सकाळी सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी मतदान केले. तसेच काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाला जाण्यापूर्वी गडकरींनी आपल्या निवास्थानी पूजा केली. त्याचबरोबर गडकरींच्या विरोधात असलेले उमेदवार नाना पटोले यांनीही मतदान केल्याचे समजते आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा –

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान सुरू आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

महाराष्ट्रातील 7 मतदारसंघात किती मतदान झाले ?

नागपूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 11% टक्के मतदान झाले.

गडचिरोलीत 8% टक्के मतदान झाले आहे.

चंद्रपूरमध्ये फक्त 2.75 टक्के मतदान झाल्याचे समजते आहे.

यवतमाळ-वाशिममध्ये 10 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान झाले आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *