Jaimaharashtra news

नागपुरात गुडांचा उच्छाद, महिलांना मारहाण करत सामान फेकले रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूर शहर हे गुंडांचं शहर आहे असं म्हणावं लागत आहे. कारण नागपूरमध्ये पुन्हा एकदा सशस्त्र गुडांनी हैदोस घालत जोरदार राडा घातला. पीडित महिलांना मारहाण, विनयभंग करत महिलांच्या दुकानातले सामान रस्त्यावर फेकून दिले.

 

पीडित महिलांच्या घरावर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं जवळपास एक तास गुडांनी हैदोस घातला. मात्र, हा प्रकार घडत असताना पोलिस कुठेच दिसून आले नाहीत. पीडित सुषमा पाटील आणि कविता पाटील यांचे अजनी भाजी विक्रीचे दुकान आहे.

 

मुख्य रस्त्यावर हे दुकान असल्यानं त्यावर भूमाफियांची नजर असल्याची माहिती आहे. या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी भूमाफिया अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. मात्र, या भूमाफियांना यश मिळत नसल्यानं मध्यरात्री पन्नास ते साठ गुडांनी अजनी भाजी विक्रीच्या दुकानावर शस्त्र हल्ला केला.

Exit mobile version