Mon. Jan 17th, 2022

नागपुरात एका खाटेवर दोन रुग्ण झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर शहरामध्ये आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे याचं चित्र पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एकाच खाटेवरती दोन ते तीन रुग्ण पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा नागपुरच्या वैद्यकीय रुग्णालयातील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका खाटेवर दोन रुग्ण झोपलेले पाहायला मिळत आहेत, तर त्या वार्डमध्ये रुग्णांसोबतच नातेवाईकांची सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे.

यापूर्वीही वैद्यकीय प्रशासनाने रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे गर्दी झाली होती अशी कबुली दिली होती आणि आज पुन्हा वैद्यकीय प्रशासनाने कबूल केले आहे की काही काळासाठी गर्दी होते. परंतु काही वेळाने रुग्णांना वेगवेगळ्या वार्डमध्ये स्थानांतरीत केले जाते. नागपुरचा मृतांचा रोजचा आकडा ६० च्या वर आहे. आरोग्य यंत्रणेच्या बैठकांमध्ये मेडिकल वार्ड वाढवण्याची चर्चा होत असते.मात्र ह्या व्हिडिओ आणि फोटोमुळे नागपुरमधील आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *