Jaimaharashtra news

खेळता-खेळता चिमुरडीचा बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरमध्ये एक हृद्यद्रावक घटना समोर आली आहे. खेळता-खेळता दीड वर्षाच्या चिमुरडीचा बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

 

गजल नावाची चिमुरडी हातातलं खेळणं बादलीत पडलं म्हणून ते काढण्याकरता बादलीत वाकली. त्या चिमुरडीचं बादलीत डोकावणं अगदी बालसुलभ होतं. मात्र, या प्रयत्नात त्या बाळाचा तोल गेला आणि ती थेट पडली पाण्याने भरलेल्या बादलीत.

 

दरम्यान, मुलीचा आवाज येत नसल्याने जेव्हा आईने इकडे तिकडे ठाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय घडलंय हे लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

 

चिमुरडीला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र चिमुरडीचा पाण्यात बुडून अंत झाला होता. गजलचे आई-वडील हे मध्य प्रदेशातील असून, रोजगारानिमित्त ते नागपुरात आले होते.

 

पालकांच्या झालेल्या दुर्लक्षामुळेच चिमुकल्या गजलचा मृत्यू झाला. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुरड्यांकडे लक्ष ठेवणं आवश्यक असून मुलं मोठं होईपर्यंत त्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी पालकांवरच असते हेही ध्यानात ठेवणं आवश्यक आहे.

Exit mobile version