Sun. Jun 20th, 2021

नागपूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

नागपूर महानगरपालिकेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान सुरु आहे. महानगर पालिकेच्या वॉर्ड १२ ड साठी ही पोटनिवडणूक होत आहे.

भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंशींचे निधन झाल्याने या वॉर्डमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

भाजपकडून जगदीश ग्वालबंशींच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून विक्रम ग्वालबंशी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. या प्रभागातून एकूण ५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.

या प्रभागात एकूण ५ उमेदवार असले तरी, मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच असणार आहे.

काँग्रेसकडून पंकज शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे.

या वॉर्डमध्ये बहुतांश हिंदीभाषिक मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून हिंदी भाषिकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल १० जानेवारी जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *