गेल्या 10 वर्षांत महापालिकेच्या इतक्या शाळा बंद

आताच शहरात मराठी भाषा दिन साजरा झाला. आमची मराठी कशी श्रेष्ठ आहे, आम्ही मराठी प्रेमी आहोत, असं कौतुक केलं गेलं.
परंतु मराठी भाषेची उपराजधीतील अवस्था अतिशय वाईट आहे. मागील 10 वर्षांत महापालिकेच्या एकूण 45 मराठी शाळा बंद झाल्या आहेत.
यातील 20 शाळांच्या इमारती अशाच धूळ खात असून काही तर बंदही झाल्या आहेत.या शाळांचा उपयोग भंगाराचे सामान ठेवण्यासाठी केला जातो.
संघ मुख्यालयाच्या मागे असलेली भाऊजी दफ्तरी शाळाही बंद असून मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसंवक संघांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या निर्वाणीसाठी दिली आहे.सूत्रांकडून ही माहीती मिळाली आहे.
शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये घट
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.
सर्व सोयी-सुविधा पुरवूनही शाळा बंद पडत आहेत.
2019 मध्ये फक्त 129 शाळा उरल्या आहेत. त्यातही मराठी शाळांची संख्या हिंदी आणि उर्दू शाळांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
हा प्रकार म्हणजे समाजातील गरीब आणि स्तरातील मुलांचा शिक्षणावरील अधिकार नाकारणे असा आहे.
इतर सहा शाळांच्या इमारतीमध्ये महापालिकेचे झोनल कार्यालय थाटण्यात आले आहे.
मट्टीपुरा येथील इमारती पाडण्यात आली असून बस्तरवीराची इमारत जीर्ण झाली आहे.
तर मस्करासाथ येथे शाळेच्या इमारतीच्या जागेवर कॉम्पेल्क्स बांधले गेले.
इतर इमारती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाईट स्कूल तुटलेले फर्निचर व सफाई कामगारांचे सामान ठेवण्यासाठी वापरल्या जातात.
तर 18 इमारती अस्थाव्यस्थ पडल्या आहेत.
मराठी शाळांकडे दुर्लक्ष
जनतेच्या निधीतून शाळांसाठी बांधलेल्या इमारती अन्य कामांसाठी वापरल्या जातात.
गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही मराठी शाळांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत.
तर शिक्षक उपलब्ध नसूनही नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली नाही.
मराठी माध्यमाच्या शिक्षणाची अशी दुर्दशा करणाऱ्या महापालिकेला प्रश्न विचारण्याचे धाडस कुणीच का करत नाही.