Tue. Oct 26th, 2021

नागपुरात पितळेच्या गणपतीची मोठी मागणी

काही दिवसातच सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांची तयारीची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमानीची उत्सुक्ता असताना पर्यावरणाचाही विचार करणे गरजेचे आहे. सध्या नागपुरात पितळेच्या गणपती मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहकांनी सुद्धा पसंती दिली आहे.

पर्यावरणाला वाचवण्यासाठी नागपुरात पितळेच्या गणपतीची मागणी –

गणेश उत्सवाच्या काळात पीओपी सारख्या मुर्त्या विसर्जित केल्यानंतर पाणी दूषित होते.

त्यामुळे मासोळ्याही मरतात आणि मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच नुकसान होते.

त्यामुळे पर्यावरणाला वाचवण्यासाठी पूरक वातावरण नसल्यामुळे पितळेच्या गणपती मूर्तीची मागणी सध्या नागपुरात होत आहे.

पितळेच्या गणपतीच्या मूर्ती वर्षभर घरी राहू शकतील म्हणून भक्तानी हा पर्याय निवडला असल्याचे म्हटलं जात आहे.

पितळेच्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाला हानी होणार असल्याने ग्राहकांनी पसंती दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *