डोक्याशी दप्तर आणि मुलांच्या वह्या घेऊन वर्गातच शिक्षीका काढते झोपा
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
शाळेत झोपणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाहिलंच असेल. पण एक शिक्षिका दाखवणारोत जी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वर्गात झोपा काढते.
नागपूरच्या कळमेश्वर जिल्हा परिषेच्या शाळेतली ही शिक्षिका चक्क डोक्याशी दप्तर आणि मुलांच्या वह्या घेऊन वर्गात झोपा काढायची.
खुद्द पालकांनी ही घटना बघितल्यानंतर त्या शिक्षिकेची शिक्षण विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार शिक्षिकेला निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत चालणारा गोंधळ पुन्हा एकदा अधोरेखित झाला.