नागपूर: या तारखेला करता येणार लसीकरण

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारपासून सगळया वाहन चालकांचं लसीकरण केले जाईल. यामध्ये ऑटो रिक्षाचालक, सायकल रिक्षाचालक, ई-रिक्षाचालक, टॅक्सी चालक, ओला-उबेर सारख्या कंपनीचे चालक आणि नागपूर महानगर पालिकेच्या वतीने मंगळवारपासून सगळया वाहन चालकांचं लसीकरण केले जाईल. यामध्ये ऑटो रिक्षाचालक, सायकल रिक्षाचालक, ई-रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ओला-उबेर सारख्या कंपनीचे चालक आणि अन्य खासगी ट्रॅव्हल्समध्ये काम करणा-या चालकांना शासकीय रुग्णालयात लस दिली जाईल.
१२ एप्रिलला पार्सलची डिलीवरी करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये होणार आहे. यामध्ये फुड डिलीवरी करणारे, पार्सल डिलीवरी करणारे सर्व नागरिकांचा समावेश आहे.
१४ एप्रिलला भाजीपाला विकणारे, फळ विकणारे आणि दुधाची डिलीवरी करणाऱ्या नागरिकांना लस दिली जाईल. तसेच १६ एप्रिलला कामगार आणि फेरीवाले, १८ एप्रिलला मीडियामध्ये काम करणारे कर्मचारी आणि पत्रकार, २० एप्रिलला व्यापारी आणि मेडिकल दुकानदार, २२ एप्रिलला रेस्टारेंट आणि हॉटेल कर्मचारी तसेच २४ एप्रिल रोजी सेल्स आणि मार्केटींगचे काम करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले जाईल.