ताडोबात माया वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू

चंद्रपूरात ताडोबा येथील माया वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मीरा वाघिण दोन वर्षांची असून तिचा आज सकाळी मृतदेह आढळला. या वाघिणीच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा आढळून आल्याने मोठ्या प्राण्याची शिकार करताना शिंग लागलं असाव असा अंदाज ताडोबातील वन विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात माया वाघिणीने पर्यटकांना चांगलेच आकर्षित केलेआहे. यामुळे अनेक पर्यटक ताडोबाला भेट देत असत. या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहीती वन विभागाने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळी ताडोबामध्ये अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पांढरपवनी येथे राहणाऱ्या प्रख्यात माया वाघिणीचा बछडा पंचधारा या भागात मृतावस्थेत आढळला.

हा माया या वाघिणीचा बछडा असून या बछड्याचे नाव मीरा आहे. रानगवा किंवा रानडुकराच्या हल्ल्यात या बछड्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

बछड्याच्या गळ्याला जखम असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाघिणीच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा आढळून आल्या आहे. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहीती वन विभागाने दिली आहे. मीरा या वाघिणीचे वय दोन वर्षे आहे.

Exit mobile version