Jaimaharashtra news

नागपूर विभागातील धरणे झपाट्याने होतायत् कोरडी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

विदर्भातील तापमान नवनवीन रेकॉर्ड करीत असतानाच धरणातील जलसाठा देखील तितक्याच झपाट्याने तळाला जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वात कमी जलसाठा नागपूर विभागात असल्याचे दिसून येत आहे.

 

नागपूर विभागातील 384 धरणांमध्ये केवळ 12.06 टक्के जलसाठा असून मे अखेरपर्यंत हा साठा आणखीन कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. तुलनेने नागपूर विभागात परिस्थिती यंदा बिकट आहे.

 

येथील 16 मोठ्या धरणांमध्ये एकूण 363 दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ 10.48 टक्के जलसाठा उपलध आहे. तर 42 मध्यम प्रकल्पांमध्ये 97 दलघमी आणि लघु प्रकल्पामध्ये 95 दलघमी जलसाठा आहे. एकूण तीनही प्रकारच्या 384 प्रकल्पांमध्ये आजचा उपयुक्त असा 12.06 टक्के आहे.

Exit mobile version