Wed. Jun 29th, 2022

कोल्हापुरात सामुहिक नमाज पठण

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त ईद साजरी करण्यात येत आहे. कोल्हापुरातील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे सामुहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लीम अनुयायी जमले होते. या वेळी पालकमंत्री सतेज पाटील मालोजीराजे छत्रपती, पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

नागपुरात पोलिसांनी मुस्लीम बांधवांसोबत साजरी केली ईद

नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातील जामा मशिदी परिसरात ईद साजरी केली गेली. यावेळी पोलिसांनी मुस्लीम बांधवांसोबत ईद साजरी केली. नागपूरच्या सह पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी मुस्लीम बांधवांना गुलाबाचे पुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, भोंग्याच्या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची नजर असणार  आहे. नागपूरमध्ये ईद उत्साहात आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. नागपूर शहरात २८३ तर जिल्ह्यात १०८ मस्जिद आहेत. त्यामुळे या ठिकाणी राज्य राखीव दल, होमगार्डसह सुमारे साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जळगावात सामुहिक नमाज अदा

रमजान ईदनिमित्त जळगाव शहरातील मैदानावर मुसलमानांतर्फे यावेळी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. दोन वर्षापासून कोरोनामुळे रमजान ईद ही अगदी साधेपणाने साजरी करण्यात येत होती मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज अदा करण्यात आली असून विश्‍वशांतीसाठी यावेळी प्रार्थना करत सर्व देशवासियांना  रमजान ईदच्या याप्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.