Jaimaharashtra news

पूर्व मुक्त मार्गाला माजी मुख्यमंत्र्यांचे नाव

मुंबईतील फ्री वे ला माजी मुख्यमंत्र्यांचे नाव देण्यात येणार आहे. पूर्व मुक्त मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला परिवहन, वित्त तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी महाराष्ट्रातील वाहतूक सूधारण्यासाठीच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुखांचे मुंबईच्या विकासासाठी असलेल्या योगदानासाठी फ्री वे ला त्यांचे नाव देण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

तसेच दिवसेंदिवस राज्य परिवहनाच्या शिवशाही बसगाडीच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. यामुळे प्रवाशी आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीची दखल घेण्यात आली.

या सर्व प्रकरणाची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी मोटार वाहन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला दिल्या.

Exit mobile version