रेल्वे स्टेशनची नावं आता उर्दूऐवजी संस्कृतमध्ये

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव हिंदी, इंग्रजी आणि राज्यभाषेत लिहिली जातात. उत्तराखंडातील रेल्वे स्टेशनवर आत्तापर्यंत हिंदी, इंग्रजीच्या बरोबर उर्दू (Urdu) भाषेत लिहिलं जातं. मात्र आता त्यात मोठा बदल केला जाणार आहे. रेल्वे स्टेशन्सची नावं उर्दूऐवजी संस्कृत (Sanskrit) भाषेत लिहिली जाणार आहेत.

उत्तराखंडाची (Uttarakhand) राज्यभाषा संस्कृत असल्यामुळे या भाषेत रेल्वे स्टेशन्सची नावं असणार असल्याचं रेल्वे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी जाहीर केलं.

उत्तर प्रदेशापासून वेगळं होऊन उत्तराखंडाची निर्मिती झाली होती.

2010 साली उत्तराखंडाची राज्यभाषा संस्कृत असल्याचं घोषित करण्यात आलं होतं

त्यानंतर तेव्हाच स्टेशनचं नाव उर्दूऐवजी संस्कृतमध्ये होणं आवश्यक होतं. संस्कृतची लिपी देवनागरी असल्यामुळे फारसा फरक पडणार नाही, असं सांगण्यात येतंय.

Exit mobile version