नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाल्याची अफवा – तनुश्री दत्ता

भारतात #MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक जणांची पोलखोल करण्यास सुरुवात झाली. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला. यामुळे बॉलिवूडमध्येच नाही तर सर्व स्तरांवर  चर्चा होऊ लागली. नाना पाटेकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार पोलिसांना मिळालेला नसल्याने क्लीन चीट देण्यात आले असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मात्र तनुश्री दत्ता स्वत: क्लीन चीट मिळाल्याची माहिती खोटी असल्याचे म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप सात महिन्यांपूर्वी केला होता.

हॉर्न ओके प्लीज या चित्रपटादरम्यान हा लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

तनुश्रीने कायदेशीररित्या गुन्हाही दाखल केला होता.

मात्र सात महिन्यानंतरही नाना पाटेकर यांच्याविरोधात साक्षीदार मिळालेला नसल्याने पोलीसांनी त्यांना क्लीन चीट दिली असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.

नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली नसून या सर्व अफवा असल्याचे तनुश्री दत्ताने म्हटलं.

तसेच नाना पाटेकर यांच्या टीमकडून ही अफवा पसरवण्यात येत असल्याचे तीने म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी असं काही म्हटलं नसल्याचे म्हटलं आहे.

नाना पाटेकरांच्या इमेज सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

 

Exit mobile version