Sun. Aug 18th, 2019

नाना पाटेकरांना तनुश्री दत्ता लैंगिक छळ प्रकरणात क्लीन चीट

0Shares

#MeToo मोहिमेमुळे अनेकांची पोलखोल करण्यात आली होती. यामध्ये अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. काही वर्षांपूर्वी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांनी एका चित्रपटात काम केले होते. यावेळी तिच्याबरोबर लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू असून या वादाला पूर्णविराम मिळाले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

गेल्या वर्षभरापासून तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

हा वाद हॉर्न ओके प्लीज या चित्रपटामुळे निर्माण झाला होता.

चित्रपटातील एक सीन शूट करताना तनुश्री दत्ताला नाना पाटेकरने लैंगिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

मात्र नाना पाटेकर यांना याप्रकरणात क्लीन चीट दिल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पाटेकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार पोलिसांना मिळालेला नाही.

तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांनी नाना पाटेकर यांनी क्लीन चीट दिली आहे.

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *