कुख्यात गुंड मन्या सुर्वे माझा मामेभाऊ होता – नाना पाटेकर

‘कुख्यात गुंड मन्या सुर्वे हा माझा मामे भाऊ होता.’ असा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात केला. भारतातील पहिलं पोलीस एन्काऊंटर मानल्या जाणाऱ्या encounter मध्ये ज्या अंडरवर्ल्ड डॉनला मारण्यात आलं होतं, तो मन्या सुर्वे आपला नातलग असल्याचं नाना पाटेकर यांनी जाहीर केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

‘तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला भेटलाय किंवा पाहिलंय का?’ असा प्रश्न मुलाखतकार समीरण वाळवेकर यांनी मुलाखतीदरम्यान विचारला.

तेव्हा मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, नाना पाटेकरांनी स्पष्ट केलं.

आम्ही त्याच्यासारखे होऊ नये म्हणून आमच्या आईने आम्हाला त्याच्यापासून दूर ठेवलं, असंही नानांनी सांगितलं.

‘पण असं आहे की थोडं सुप्त होऊन तुमच्या ते असतंच ना?’ असंही सूचक विधान नाना पाटेकरांनी केलं.

‘नेहमी आरडाओरडा करणारा कधीच गुंड नसतो, पण शांत असणारा गुंड असतो. म्हणूनच तो ‘मारेन, मारेन’ म्हणत नाही, थेट मारतो. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो पण सुशिक्षित माणूस गुंड झाला तर गोंधळ होतो. कारण तो सर्वच करू शकतो’ असं नाना पाटेकर म्हणाले. यावेळी त्यांनी ‘गॉडफादर’ चित्रपटाचे उदाहरण नानाने दिलं.कोण होता मन्या सुर्वे?

मन्या सुर्वेचं खरं नाव मनोहर सुर्वे होतं.

80 च्या दशकातला तो कुख्यात गुंड होता.

तो सुशिक्षित होता. त्याला पदवी परीक्षेत 78 % गुण मिळाले होते.

आपल्या भावामुळे तो गुन्हेगारी क्षेत्रात ओढला गेला.

मन्या सुर्वे हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा कट्टर दुश्मन होता.

11 जानेवारी 1982 रोजी पोलिसांनी encounter मध्ये मन्याचा खात्मा केला होता.

मन्या सुर्वेच्या एन्काऊंटरवर आधारित ‘Shootout at Wadala’ हा सिनेमा काही वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. अभिनेता जॉन अब्रहमने या सिनेमात मन्या सुर्वेची भूमिका केली होती.

Exit mobile version