Fri. Aug 12th, 2022

गडकरींच्या आशीर्वादाने मी 4 लाख मतांनी विजयी होईन- नाना पटोले

“नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन” असे उद्गार काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी काढले आहेत. नाना पटोले हे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले.

पटोलेंचा गडकरींना टोला

नितीन गडकरींविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली.

यावर गडकरी यांनी आपला आशीर्वाद नाना पटोले यांच्या पाठीशी असल्याचं विधान केलं होतं.

यालाच प्रत्युत्तर देताना गडकरी हे आपल्या ज्येष्ठ बंधूंसारखे असल्याचं पटोले यांनी म्हटलं.

तसंच त्यांचे जर आशीर्वाद असतील, तर 4 लाख मतांनी आपण निवडून येऊ, असा टोलाही लगावलाय.

राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

या निवडणुकीत काँग्रेस एकदिलाने काम करणार असल्याचंही पटोले म्हणाले.

संबंधित बातमी- नाना पटोले यांना माझा आशीर्वाद – नितीन गडकरी

नाना पटोले २०१८ साली भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. गडकरी आणि पटोले हे एकेकाळी एकमेकांचे चांगले सहकारी होते. मात्र पक्षाशी मतभेद झाल्यावर त्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.