Mon. Jan 24th, 2022

नाना पटोले यांना माझा आशीर्वाद – नितीन गडकरी

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले निवडणूक लढवणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले लढणार असल्यामुळे गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझा आशीर्वाद संपला नाही!”

नाना पटोले यांनी २०१८ रोजी भाजप पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

नाना पटोले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला होता.

नाना पटोले हे नितीन गडकरी यांचे चांगले सहकारी होते.

भाजपासोबत मतभेद झाल्यामुळे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर त्यांना या लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने नागपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले नागपूर येथून लढणार आहेत.

मात्र नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच पक्ष सोडला तरी माझा  आशीर्वाद संपला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले तरूण आहेत, तसेच त्यांनीही लढले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *