Wed. Dec 8th, 2021

नांदेडमध्ये बोअरवेलमधून निघतोय लावारस

नांदेडमध्ये बोअरलमधून लावारस निघत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जांभरून गावातील तुकाराम देशमुख यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. नेमकं असा प्रकार का घडला याचे कारण समजू शकलेले नाही. परंतु अशा प्रकाराने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.

नेमकं काय घडलं?

नांदेड मध्ये चक्क बोअरवेलमधून लावारस निघत असल्याने जांभरून गावच्या नारिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमका हा प्रकार का घडला याचे कारण समोर आले नसून गावात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

जांभरून गावातील तुकाराम देशमुख यांनी त्यांच्या शेतात काही दिवसापूर्वी बोअरवेल मारला होता.

त्यावेळी त्या बोरवेलला पाणी लागले नव्हते पण आता चक्क लावा रस निघत आहे.

या घटनेची माहिती देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिली.

बोरवेल मधून लावारस निघत असल्यासने गावातील लोक देशमुख यांच्या शेतात लावारस पहाण्यासाठी गर्दी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *