Jaimaharashtra news

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित, मुख्यमंत्र्यांची लेखी माहिती!

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्ट्यात होऊ घातलेला मात्र वादग्रस्त ठरलेला नाणार रिफायनरी प्रकल्प आता रायगड येथे स्थलांतरित होणार आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात लेखी माहिती दिली आहे.

राजापूरमधून नाणार प्रकल्प रायगडात!

सौदी अरेबियाच्या ‘अराम्को’ आणि इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहाय्याने बनणारा तेलशुद्धीकरण प्रकल्प नाणार येथे होणार होता.

मात्र नाणारवासीयांनी या प्रकल्पाला प्रखर विरोध केला.

या प्रकल्पामुळे कोकणातील जीवसृष्टी धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात होती.

फळं तसंच मासे यांची हानी होणार होती.

यामुळे स्थानिकांनी नाणार येथे हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशाराच दिला होता.

भाजपचा सहकारी असणाऱ्या शिवसेनेनेही नाणारला विरोध केला होता.

युती करतानाही हा प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन भाजपकडून घेतलं होतं.

त्यामुळे हा तेलशुद्धीकरण प्रकल्प नाणारमधून आता हद्दपार होणार आहे.

त्याऐवजी हा प्रकल्प रायगड येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.

मात्र रायगडमध्ये या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध नसल्याचं मुख्यंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे हा प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात आता होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तराने रायगडवासीयांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

Exit mobile version