Sat. Jul 31st, 2021

जागा बदलेल मात्र नाणार प्रकल्प कोकणातच होणार!

कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प हा रद्द केला होता.

मात्र नाणार प्रकल्पाची जागा बदलली असून तो कोकणातच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.

शिवसेनेने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीसंदर्भात घातलेल्या अटींमुळे नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला होता.

नाणारसाठी पर्यायी जागांचा शोध सुरू

लोकसभा निवडणूकीनंतर नाणार प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहीती आहे.

नाणार प्रकल्प किनारपट्टीवरच होऊ शकत असल्यामुळे तो कोकणातच होऊ शकतो अशी माहीती सुत्रांनी दिली.

स्थानिक नागरीक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर नाणारचं भुसंपादन रद्द करण्यात आले.

नाणार रिफायनरी  प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असून देशाचाही फायदा होणार आहे.

या प्रकल्पात आणि पूरक उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक होईल त्यामुळं हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

नाणारसाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये आंबा, काजूच्या लागवडीमुळे ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध होतो.

त्यामुळे ही लागवड कमी असलेल्या परिसरात किंवा रायगड जिल्ह्य़ात पर्यायी जागांबाबत विचार करण्यात येत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *