Mon. May 17th, 2021

नाणारची जागा निश्चित;नाणार उभारणार रोह्यात

कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प हा रद्द केला होता.

मात्र नाणार प्रकल्पाची जागा बदलली असून तो कोकणातच  रोहा परिसरात  होणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीसंदर्भात घातलेल्या अटींमुळे नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला होता.

कुठे होणार नाणार प्रकल्प ?

महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प कोकणातील  रोहा परिसरात होणार.

नाणार रिफायनरी  प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असून देशाचाही फायदा होणार आहे.

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहाय्याने  हा प्रकल्प पुर्ण होणार आहे.

सुमारे तीन लाख कोटींचा हा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे.

नाणारमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्यात आल्यानंतर आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी हा प्रकल्प उभारण्याची इच्छा दर्शविली होती.

एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी रोहा तालुक्यातील 21, अलिबाग (8), मुरूड (10) आणि श्रीवर्धन तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे.

नाणारमध्ये भूसंपादनास जो विरोध झाला तो  रोह्य़ात तो होऊ नये यासाठी  सरकार प्रयत्नशील आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *