Jaimaharashtra news

वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न

नांदेड: मुखेड तालुक्यातील खतगाव येथे मुसळधार पाऊस झाल्याने एक ६५ वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेला आहे. यामध्ये त्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

मुखेड तालुक्यातील खतगाव येथे विठ्ठल धोंडीबा माने हे शेतात शेळ्या चारून घरी परतत असताना मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. पावसामुळे गावातील पुलावरून पाणी वाहत होते. विठ्ठल माने यांना या पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले.

दुर्दैवाची बाब म्हणजे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना नागरिक मात्र मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात मग्न होते. वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह तळ्याच्या कडेला आढळून आला. वृद्ध वाहून जात असताना मात्र तेथील लोकांनी त्या वृद्धाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी व्हिडीओ काढले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेमुळे वृद्धाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Exit mobile version