Sat. Sep 21st, 2019

पूरग्रस्तांसाठी नांदेडच्या हुजूर साहेब गुरुद्वारेकडून मदत!

0Shares

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आला असून अनेक गावे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन अस्ताव्यस्त झालंय. शासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत.

नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डानेदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

अन्नधान्य आणि इतर साहित्याचे 3 ट्रक आणि 2 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.

महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत.

पुराच्या पाण्यासोबतच महामारी पसरण्याचीही दाट शक्यता आहे.

राज्यभरात पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.

त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचा एक जत्थादेखील गुरुद्वारा बोर्डातर्फे पाठविण्यात आलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *